JEE च्या माहिती पुस्तिकेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी माहिती द्या: सुप्रीम कोर्ट

JEE परीक्षेसंबंधी सुप्रीम कोर्टाने JEE साठी उपस्थित होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट सुविधांच्या आवश्यकतांवर जोर दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की परीक्षेतील पर्यवेक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षित करायला हवे. एका दिव्यांग विद्यार्थिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही विद्यार्थिनी डिस्ग्राफिया या विकाराने ग्रस्त आहे. या आजारात अध्ययन अक्षमतेने व्यक्ती ग्रस्त असते, या विकारात हळूहळू लिहिण्याची क्षमता मंदावते. या विद्यार्थिनीने पुनर्परीक्षा किंवा गुण देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश या विद्यार्थिनीने आरोप केला होता की तिला नीट परीक्षा पूर्ण करण्यासाठी एक तासाचा अतिरिक्त कालावधी दिला नव्हता. पेपर हिसकावून घेतला. सुनावणी दरम्यान न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला सांगितले की JEE च्या माहिती पुस्तिकेत दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा असायला हवी आणि पर्यवेक्षकांचेही यादृष्टीने प्रशिक्षण व्हायला हवे. धोरणात्मक दृष्ट्या निर्णय घ्यायला हवा. दिव्यांग कोट्यातील रिक्त जागेवर या विद्यार्थिनीला समायोजित करता येईल का यावर विचार करून उत्तर देण्याचे आदेश खंडपीठाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले आहेत. न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे वकील रूपेश कुमार म्हणाले की १६ लाख विद्यार्थी होते, त्यामुळे असा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत यावर लेखी उत्तर मागितलं आहे, त्यानंतर कोर्ट अंतिम आदेश जारी करेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DAcwOb
via IFTTT

Post a Comment

0 Comments