SSC Recruitment: स्टेनोग्राफर पेपर १ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

SSC Recruitment: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) तर्फे परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या परीक्षेची जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका पाहता येणार आहे. याच महिन्यात ११ ते १५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी परीक्षा २०२० झाल्या होत्या. त्याच्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या आहेत. स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील पेपर १ ची उत्तरतालिका आयोगाने गुरुवारी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केली. यासोबतच स्टाफ सिलेक्शनने स्टेनो पेपर १ च्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची रिस्पॉन्स शीट देखील प्रसिद्ध केली आहे. स्टेनोग्राफर पेपर १ च्या परीक्षेत बसलेले उमेदवार आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अॅक्टीव्ह केलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट डाऊनलोड करू शकतात. २८ नोव्हेंबरपर्यंत नोंदवा आक्षेप एसएससी स्टेनोग्राफर परीक्षा २०२० च्या पेपर १ साठी उमेदवारांची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट जाहीर करण्याबरोबरच उमेदवारांना त्यावर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोगाने कोणत्याही प्रश्नासाठी जारी केलेल्या उत्तरपत्रिकेवर काही आक्षेप असल्यास उमेदवार ते नोंदवू शकतात. आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा बातमीखाली दिलेल्या लिंकद्वारे लॉगिन करावे लागेल. यानंतर उमेदवार संबंधित प्रश्नासाठी त्यांचे आक्षेप नोंदवू शकतील. तसेच उमेदवारांना आक्षेप नोंदविताना प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल. स्टाफ सिलेक्शनच्या नोटिफिकेशननुसार उमेदवार २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपला आक्षेप नोंदवू शकतात. स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी परीक्षा २०२० पेपर १ च्या उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर कर्मचारी निवड आयोगाकडून अंतिम उत्तरतालिता जाहीर केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CNIGot
via IFTTT

Post a Comment

0 Comments