Mhada Recruitment: 'या' खासगी कंपनीला परीक्षा घेण्याचा अधिकार, आव्हाडांची मोठी घोषणा

Exam: आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत पेपरफुटीची प्रकरणे समोर आल्यानंतर याच भीतीने म्हाडाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा परीक्षेच्या आदल्या रात्रीच याची घोषणा केली. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आणि विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले. या पार्श्वभूमीवर आता म्हाडाने परीक्षा घेण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडा पदभरतीच्या परीक्षा आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीमार्फत होणार आहेत. परीक्षा घेताना म्हाडाकडून टीसीएसचे सहाय्य घेतले जाईल अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. परीक्षेत पारदर्शकता राहावी, गरिब घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसावा हा यामागचा हेतू असल्याचे ते म्हणाले. कोणाला हाताशी धरुन गरीबांची जागा हिसकावता येणार नाही. दलालांना पैसे दिले असाल तर त्यांची नावे आम्हाला कळवा आम्ही त्यांना धडा शिकवू असे आवाहनही आव्हाड यांनी केले. ज्या एजन्सी ५-७ वर्षे यासाठी काम काढून घ्यावे आणि टीसीएस सारख्या विश्वासआर्ह कंपनीला हे काम द्यावे हा निर्णय आम्ही घेतल्याचे आव्हाड यावेळ म्हणाले. डाची परीक्षा ( ) ही अपरिहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली होती. खासगी संस्थांच्या माध्यमातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या दरम्यान गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत चालले होते. पेपर फुटल्याची माहिती देखील म्हाडाला मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात देखील घेतले. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये परिक्षार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. या सगळ्या बाबींना रोख बसण्यासाठी म्हाडाला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे आव्हाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप पाहता परिक्षार्थ्यांकडून परीक्षेसाठी आकारलेले शुल्क हे म्हाडाकडून परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील परीक्षा ही म्हाडा स्वतः घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तसेच पुढे म्हाडातर्फे होणाऱ्या परीक्षेसाठी कुठलीही फी आकारली जाणार नसल्याचे देखील आव्हाड म्हणाले. आता नव्या निर्णयानुसार परीक्षेसाठी टीसीएसचे सहाय्य घेतले जाणार आहे. आव्हाड यांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना पहिली नसून याआधी देखील आरोग्य खात्याच्या परिक्षेदरम्यान पेपर फुटले होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ज्या तीन जणांना ताब्यात घेतले त्या तीन जणांमधील दोन जण हे आरोग्य खात्याच्या पेपर फुटीत सामील होते. या प्रकरणात ज्यांना म्हाडाच्या पेपरचे काम दिले होते, त्यांचा मालक सापडला. त्यांच्या लॅपटॉपमध्ये प्रश्नपत्रिका आढळल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मी एकमेव असा मंत्री आहे की जो तीन दिवस सतत परिक्षार्थ्यांच्या संपर्कात होतो. दुसरा कुठलाही मंत्री हे करणार नाही. परीक्षा होण्याआधी पोलिसांना मी विनंती केली होती आणि पोलिसांनी करून दाखवलं. सरकार आहे म्हणून हे झाले. परीक्षार्थींना न्याय मिळायला पाहिजे. हे 'वशिल्यातले टट्टू' मंत्रालयात जातात. त्याच्यानंतर भ्रष्टाचार वाढत जातो. त्याला रोखण्याचा काम आम्ही केले असल्याचे आव्हाड म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dMYqh9
via IFTTT

Post a Comment

0 Comments