Also visit www.atgnews.com
जेएनयूमध्ये 'असा' मिळेल प्रवेश, शैक्षणिक परिषदेत महत्वाचा निर्णय
JNU Admissions : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (Jawaharlal Nehru University) बुधवारी झालेल्या त्यांच्या शैक्षणिक परिषदेच्या () बैठकीत विद्यापीठ प्रवेशासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक सत्रापासून कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेद्वारे (CUET) प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या प्रवेश विभागाचे संचालक जयंत के. त्रिपाठी यांनी यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. त्यानुसार कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेशाच्या निर्णयाला सर्व सदस्यांकडून पाठिंबा मिळाला आहे. या शैक्षणिक परिषदेच्या चर्चेत शाळेचे डीन, केंद्र अध्यक्ष आणि परिषदेच्या बाहेरील सदस्य उपस्थित होते. CUET देशभरातील अनेक पात्र विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करुन देते यावर सर्व सदस्यांनी भर दिला. दरम्यान जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (JNUTA) आणि विद्यार्थी संघाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दिल्ली विद्यापीठातही प्रवेश परीक्षा दिल्ली विद्यापीठाने नुकतेच पुढील शैक्षणिक सत्रापासून सीयूसीईटी (CUET) मार्फत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विद्यापीठातील प्रवेश परीक्षा पुढील शैक्षणिक सत्रात होणार आहे. या परीक्षेत सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, असे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर योगेश सिंह म्हणाले होते. बोर्डाच्या परीक्षेनंतर महिनाभरात या परीक्षा घेतल्या जातील. वर्षातून दोनदा ही परीक्षा घेण्याचाही विद्यापीठ विचार करत असल्याचे ते म्हणाले होते. IIT जम्मूमध्ये करोनाचा शिरकाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जम्मू काश्मीरमध्ये (Indian Institute of Technology) मध्ये करोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यानंतर आयआयटी जम्मू प्रशासनाने ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटी जम्मूकडून यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आयआयटी जम्मूच्या कॅम्पसमध्ये घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आयआयटी जम्मूच्या कॅम्पसमध्ये वेळोवेळी करोना चाचणी केली जात आहे. गेल्या आठवड्यात कॅम्पसमध्ये ३०० लोकांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी १८ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचे आयआयटी जम्मूच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tlDUNR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments