IIT खरगपूरकडून गेट परीक्षेसाठी ट्रॅव्हल पास जारी

2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर () ने इंजिनीअरिंगमधील सर्व ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूट टेस्ट (GATE 2022) किंवा मास्टर्स (JAM २०२२) च्या संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी प्रवास पास (Travel Pass) जारी केला आहे. आगामी गेट परीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींना या पासचा वापर करुन परीक्षा केंद्रावर पोहोचता येणार आहे. उमेदवारांना गेट परीक्षा प्रवास पास मिळविण्यासाठी IITKGP GATE वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर लॉगिन करावे लागणार आहे. येथे जाऊन विद्यार्थी सोप्या पद्धतीने पास डाउनलोड करू शकतात. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी खरगपूर (IITKGP) प्रवेशपत्र २०२२ असलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी या पासचा वापर करावा लागणार आहे. परीक्षा आयोजित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गेट २०२२ चे प्रवेशपत्र १५ जानेवारी रोजी अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in येथे जारी केले आहे. उमेदवार त्यांचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरून गेट २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र असे करा डाउनलोड सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जा. होमपेजवरील अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा. नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. GATE प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल. डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या. गेट आणि जेएएम या परीक्षा ५, ६, १२, १३ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहेत. गेट २०२२ च्या परीक्षेला काही दिवस उरले असताना काही विद्यार्थी IITKGP परीक्षा २०२२ पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. देशातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेट २०२२ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. असे असले तरी अधिकारी तारखांनुसार प्रवेश परीक्षा घेण्यास सज्ज आहेत. आयआयटी खरगपूर गेट २०२२ आणि JAM २०२२ परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. या परीक्षा कॉम्प्युटर आधारित चाचणीच्या माध्यमातून होतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oBHkp6f8Y
via IFTTT

Post a Comment

0 Comments