सीबीएसई परीक्षा पॅटर्न सोपा? ४० ते ५० टक्के प्रश्न बहुपर्यायी?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आपल्या परीक्षा प्रणालीत बदल करून बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा करेल, अशी चर्चा सुरू असून, नव्या बदलानुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ४० ते ५० टक्के प्रश्न बहुपर्यायी करण्यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. हा निर्णय झाल्यास याचा मोठा फटका राज्य मंडळाच्या (एसएससी आणि एचएससी) विद्यार्थ्यांना बसेल, अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. सीबीएसईने परीक्षा प्रणालीत सुधारणांसाठी नवा आराखडा तयार केला आहे. विविध पर्याय शोधत परीक्षेचा पॅटर्न सोपा केला जाणार आहे. दहावी आणि बारावी परीक्षेत पुढील वर्षी नवे नियम लागू करण्याच्या हालचाली आहेत. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेनंतर जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स वा नीट यांसारख्या परीक्षाही बहुपर्यायी द्याव्या लागतील. त्यामुळे ४० ते ५० टक्के प्रश्न बहुपर्यायी टाईप करण्यासंदर्भातील हालचाली सुरू आहेत. बहुपर्यायी पॅटर्नमुळे निकालही लवकर तयार होतील. परीक्षेचे आयोजन १०० टक्के कॉम्प्युटर बेस्ड होईल. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अधिक शिक्षकांची गरज भासणार नाही. निकालही वेळेवर लागतील. असाही प्रयत्न आहेत. विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या तणावातून मुक्त होतील. असे धोरण तयार केले आहे. सीबीएसईच्या बदलत्या धोरणांचा फटका राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसू शकतो अशी शक्यता शिक्षकांनी व्यक्त केली आहे. आपल्या राज्य मंडळाचा दहावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाने दोन वर्षापूर्वीच बदलला आहे. तसेच बारावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. त्यामुळे यासमोर केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आवाहन असेल, असे सांगण्यात येते. राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई या मंडळांची गर्दी मुंबई, पुण्यासारख्या शहरांत दिसून येते. मात्र, या सर्व मंडळाच्या दहावीचे गुण देण्याच्या पद्धतीत फरक असल्यामुळे याची अडचण अकरावी प्रवेशात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येते. त्याचा मोठा फटका राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसतो, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी राज्य मंडळाने भाषा विषयांचे अंतर्गत गुण रद्द करून १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला घेतला होता. त्याचा मोठा फटका बसल्यानंतर यंदा पूर्वीप्रमाणे भाषा विषयांचे २० गुणांचे मूल्यमापन सुरू केले. गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मिळणारे अंतर्गत गुण रद्द केल्याचा फटका तेव्हा बसल्याने संताप व्यक्त झाला होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cQmzB2
via IFTTT

Post a Comment

0 Comments