Also visit www.atgnews.com
बालभारती: ८१ लाखांपेक्षा अधिक पीडीएफ डाउनलोड!
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत () पुस्तके उपलब्ध करून देण्याला शनिवारी सुरुवात झाली. बालभारतीकडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून; तसेच लाभार्थी नसलेल्या पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुणे विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास शनिवारी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानानंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांना पुणे विभागात ९५ लाख ९० हजार ३२४ इतक्या प्रतींचे वितरण केले जाणार आहे. याशिवाय खुल्या बाजारात पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होतील. खासगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता ही पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. या वेळी प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, वित्त व लेखा अधिकारी अंकुश नवले, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, पुणे भांडार व्यवस्थापक विनोद अस्मर आदी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. ८१ लाखांपेक्षा अधिक पीडीएफ डाउनलोड राज्यामध्ये लॉकडाउन असल्यामुळे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ फाइल मंडळाच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पीडीएफ पुस्तकांना भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ८१ लाख पीडीएफ डाउनलोड झाल्या आहेत. इयत्ता बारावीच्या २० लाख ५४ हजार १९४, तर व इयत्ता पहिली ते अकरावीच्या ६१ लाख २० हजार ७५३ पीडीएफ फाइल डाउनलोड केल्या गेल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन नोंदणी राज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्याकरीता पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे. पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाइन पद्धतीने २४ तासांत केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युझर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून, त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या लिंकहून पाठ्यपुस्तकांची ऑनलाइन मागणी नोंदविता येणार आहे. बँक ट्रान्स्फर/क्रेडिट अथवा डेबिट कार्ड; तसेच आरटीजीएस /एनइएफटीच्या माध्यमातून या पुस्तकांच्या रकमेचा भरणा मंडळाच्या पेमेंट गेट वेमार्फत करता येणार आहे. मंडळाकडे रक्कम भरणा केल्याची खात्री झाल्यानंतर याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना एसएमएस पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Zy6v3v
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments