... तर दहावीचे वर्ग प्राधान्याने सुरू करणार: वर्षा गायकवाड

School Reopening 2020: नीट आणि जेईई मेन परीक्षा कोविड काळात घेऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. करोना काळात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून परीक्षा लांबणीवर टाकाव्यात असे मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले. शाळा सुरू करण्याविषयीदेखील त्या बोलल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'राज्यातील एमपीएससी परीक्षाही लांबणीवर पडलेल्या आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तर भीतीचं वातावरण आहे. त्यात परीक्षांसंदर्भातील संभ्रमाची भर पडली आहे. नक्की काय होणार हे त्यांना माहिती नाही. या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या तर ते विद्यार्थीहिताचे असेल.' केंद्र सरकारने परवानगी दिली तर भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग प्राधान्याने सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्रालयाने स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जारी करून परवानगी दिली तर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करता येतील. दहावीचे वर्ग सर्वात आधी नंतर बारावी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वर्ग सुरू करण्याची राज्य सरकारची भूमिका असेल.' देशातील शाळा टप्प्याटप्प्याने 'अशा' उघडणार! केंद्र सरकारने शाळा उघडण्याबाबतची योजना तयार केली आहे. यानुसार देशातील शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था येत्या १ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. मात्र अंतिम निर्णय त्या त्या राज्य सरकारांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यावयाचा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच एक बैठक झाली. यात कोविड-१९ परिस्थिती आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टप्प्याटप्प्याने शाळा उघडण्याची शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या १५ दिवसांसाठी दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जातील. विविध तुकड्यांना विविध दिवशी शाळेत हजेरी लावण्यास सांगितले जाईल. शाळेचे तासही ५-६ वरून कमी करून २ ते ३ तास करण्यात येतील. सर्व शाळा सकाळी ८ ते ११ आणि दुपारी १२ ते ३ अशा दोन सत्रात भरवल्या जाण्याची शक्यता आहे. मधला एक तास सॅनिटायझेशनसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. शाळांना ३३ टक्के उपस्थितीने कार्यरत राहण्याची शिफारस करण्यात येणार आहे. या शिफारशी केंद्राने स्वीकारून पुढील मार्गदर्शक तत्वे जारी केल्यास शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34MKsc9
via IFTTT

Post a Comment

0 Comments