Also visit www.atgnews.com
लॉ सीईटीचा निकाल जाहीर; टॉप १० पैकी ९ मुली!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात चार विद्यार्थ्यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तब्बल नऊ मुलींनी बाजी मारली आहे. यंदा करोनामुळे तीन विधी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा लांबणीवर गेली होती. २ आणि ३ नोव्हेंबर या कालावधीत ती आयोजित करण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ५५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ४३ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलने बुधवारी जाहीर केला. या परीक्षेत मुग्धा पटवर्धन या विद्यार्थिनीने १५०पैकी ११८ गुण मिळत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर दुसरा क्रमांक युक्ती अरोरा हिने मिळवला असून, तिलाही ११८ गुण मिळाले आहेत. मुलांमध्ये प्रथम आलेल्या अनिरुद्ध सिद्धये यालाही ११८ गुण असून, गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक आला आहे. तर वृंदा भोला या विद्यार्थिनीसही ११८ गुण मिळाले असून. ती गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36B4x5v
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments