नोकरी आली धावून: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये व्हा अधिकारी

प्रा. संजय मोरे आजच्या स्पर्धात्मक आणि जलदगतीने बदलणाऱ्या युगात आपण यशस्वी व्हावं अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. अशी इच्छा असणंही योग्यच आहे. यश-अपयश हे दोन शब्द प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतात. आपण नेहमी आपल्याला यश कसं मिळेल याच्याच प्रयत्नात असतो. पण, हे लक्षात ठेवा यश हे प्रयत्नांनीच मिळतं. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा ही अनिवार्यच आहे आणि ज्यांची तयारी व्यवस्थित असते अशा उमेदवारांना नोकरी नक्कीच मिळते. पण, काही विद्यार्थी असा प्रयत्न करताना दिसत नाहीत. परिणामी, त्यांना परीक्षेमध्ये अपयश येतं. अपयश आल्यानंतर माझ्या नशिबात सरकारी नोकरीच नाही असा पश्चाताप करून घेताना दिसून येतात. आपल्याला जर एखादं मोठं यश मिळवायचं असेल तर तसा प्रयत्न आधीपासूनच करायला हवा. मग, यश तुमच्यात हातात आहे. सरकारी नोकरीद्वारे देशासाठी खूप मोठं योगदान देता येऊ शकतं. देशासाठी काही तरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हे एक चांगलं माध्यम आहे. त्यासाठी अभ्यासाबरोबरच चांगली गुण-वैशिष्ट्यं अंगीकारली पाहिजेत. नुकतीच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये () असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही नोकरी मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या. ० निवडप्रक्रिया व अभ्यासक्रम इंटेलिजन्स ब्युरोतर्फे भरतीप्रक्रिया ही तीन स्तरावर होणार आहे. पहिल्या स्तरावर ऑब्जेटिव्ह परीक्षा ही १०० प्रश्नांची आणि १०० गुणांची असेल. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या स्तरावरील परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. ही परीक्षा डिस्क्रीप्टीव्ह प्रकारची असून ५० गुणांची असेल. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि यातूनच निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. ऑब्जेटिव्ह परीक्षेमध्ये जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टीट्यूड, रिझनिंग आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असेल. तर डिस्क्रीप्टीव्ह परीक्षेमध्ये निबंध ३० गुणांसाठी तर २० गुणांसाठी क्रॉम्प्रेहेन्शन आणि सारांश लेखन असा भाग असेल. लक्षात ठेवा, यशाला शॉर्टकट नसतो. झटपट अभ्यास आणि झटपट नोकरी या भ्रमात राहू नका. स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात एकच टक्का विद्यार्थी यश मिळवतात असं दिसून आलं आहे. म्हणूनच अभ्यासक्रम समजून घ्या आणि अधिकारी होण्यासाठी तयारीला लागा. संस्थेचं नाव- इंटेलिजन्स ब्युरो पदाचं नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एकूण पदं- दोन हजार शैक्षणिक पात्रता- पदवीधर वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षं ऑनलाइन रजिस्ट्रेशन- १९ डिसेंबर, २०२० ते ९ जानेवारी, २०२१ वेबसाइट- www.mha.nic.in प्रश्नोत्तर ० माझं बीएससीचं शेवटचं वर्ष सुरु आहे. मला बीएआरसी किंवा आयकर विभागात नोकरी करायची आहे. यासाठी बीएससी झाल्यानंतर थेट अर्ज करु शकते? की त्यासाठी काही खास अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल? - प्राजक्ता कदम कोणत्याही प्रकारचा खास अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. बीएआरसीमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली जाते. तसंच आयकर विभागात नोकरी करायची असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38hW3zW
via IFTTT

Post a Comment

0 Comments