CBSE Exam Dates: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा ४ मे पासून

CBSE Board Exam Date Updates: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यानी कोणत्याही ताणतणावाशिवाय पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्याव्यात, असं आवाहन पोखरियाल यांनी केले आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण त्या मार्च-एप्रिल महिन्यातही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचा निकाल वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. १५ जुलै पर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र २०२० मध्ये करोना परिणामामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले परिणामी परीक्षाही थोड्या विलंबाने होणार आहेत. नेमकं काय म्हणाले शिक्षणमंत्री पोखरियाल? हेही वाचा : करोना काळात शिक्षक-विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी पोखरियाल म्हणाले, 'आम्ही सातत्याने विद्यार्थी-शिक्षकांशी परीक्षांसंबंधी संवाद साधत आहोत. करोना संकट काळात ज्या पद्धतीने तुम्ही स्वत:ला तयार केले आहे, विशेषत: शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या काळात खूप संयमाने, तयारीने आणि संपूर्ण मनोबलाने परीक्षा दिली, अभ्यास केला, शिक्षकांनी शिकवले आणि विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचवले. आपल्या देशात एक हजारहून अधिक विद्यापीठे आहेत, सुमारे ४५ ते ५० हजार पदवी महाविद्यालये आहेत. १ कोटी १० लाख शिक्षक आहेत. १५ ते १६ लाख शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थ्यांची संख्या (३३ कोटी) अमेरिकेच्या लोकसंख्येहूनही जास्त आहे. शिक्षकांनी या महामारी काळात खूप चांगली कामगिरी केली आहे. इतक्या कोटी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणं हे खरंच खूप मोठं आव्हान होतं आणि ते आपण पेललं. काही विद्यार्थ्यांना सुविधांअभावी सुविधा मिळाली नाही, त्यांना आपण टीव्ही आणि अन्य माध्यमांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.' दरम्यान, देशाने नव्या शिक्षण धोरण २०२० ला उत्सवी रुपात स्वीकारले आहे, असेही पोखरियाल म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WY29QJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments