दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्टात भरती; लेखी परीक्षेशिवाय भरणार हजारो पदे

Post Office Bharti 2021: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये हजारो पदे भरली जाणार आहेत. ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल २,४२८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमदेवार अर्ज करू शकतात. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेटिर लिस्ट तयार होईल. ग्रामीण डाक सेवक भरतीअंतर्गत ब्रान्च पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रान्च पोस्टमास्टर, डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य. निवडीसाठी दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होणार आहे. मात्र दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार. तांत्रिक पात्रता - मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून ६० दिवसांचे बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट अनिवार्य. - ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी किंवा उच्च शिक्षणात कॉम्प्युटर एका विषयाच्या रुपात अभ्यासला असेल, त्या उमेदवारांना कॉम्प्युटरच्या बेसिक माहितीच्या सर्टिफिकेट अनिवार्यतेतून सवलत मिळेल. वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल. महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरु होण्याची तारीख - २७ एप्रिल २०२१ अर्ज करण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची अखेरची मुदत - २६ मे २०२१ निवड प्रक्रिया - उमेदवारांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या आधारे मेरिट यादी तयार करून निवड केली जाईल. - उच्च शिक्षण योग्यता असेल तरी त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड ही दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच होईल. - जर उमेदवाराना पाच पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहे आणि मेरिटच्या आधारे त्याची एकापेक्षा अधिक पदांवर निवड झाली तर त्याची एकाच पदावर निवड होईल. मासिक वेतन -बीपीएम पदासाठी १२ हजार ते १४,५०० रुपये - जीडीएस/एबीपीएमसाठी १० हजार ते १२ हजार रुपये हेही वाचा: अन्य अटी निवास: पदांसाठी अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांनी निवडीच्या एक महिन्याच्या आत संबंधित ब्रान्च पोस्ट ऑफिसच्या गावी राहण्याचा दाखला द्यावा. उत्पन्नाचा स्रोत: निवड होणाऱ्या उमेदवारांना हे सिद्ध करावे लागेल की त्यांच्याकडे उत्पन्नाचा आणखी एक स्रोत आहे. म्हणजेच ते आपल्या उपजिविकेसाठी केवळ पोस्टातून मिळणाऱ्या वेतनावर अवलंबून नाही. हा दाखलाही ३० दिवसांच्या आता द्यावा लागेल. महाराष्ट्र सर्कलसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६२१४ या क्रमांकावर किंवा gdsrectt.mah@gmail.com या इमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aIbDHe
via IFTTT

Post a Comment

0 Comments