CA exams 2021: सीए फायनल आणि इंटरमिडिएट परीक्षा लांबणीवर

देशात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने २१ आणि २२ मे पासून सुरू होणारी सीए फायनल आणि इंटरमिडिएट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे सीएची परीक्षा घेण्यात येते. सीएची फायनल परीक्षा २१ मे पासून तर इंटरमिडिएट परीक्षा २२ मे पासून सुरू होणार होती. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारीख जाहीर करण्यात येईल. परीक्षेपूर्वी किमान २५ दिवस आधी तारीख जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.icai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nsb612
via IFTTT

Post a Comment

0 Comments