परदेशी शिक्षणाचा विचार करताय?

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर परीक्षा जरी रद्द किंवा पुढे ढकलल्या गेल्या असतील तरी करिअरबाबत भविष्यकालीन योजना आखणं आणि त्याबाबत अपडेटेड राहणं देखील आवश्यक आहे. जे परदेशी शिक्षणाचा विचार करीत आहेत असे विद्यार्थी कदाचित आगामी शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करतील, तेव्हा लवकरात लवकर आपल्या भविष्यकालीन योजना आखणं व त्या अनुषंगानं काम करण्यास सुरुवात करणं नक्कीच हितकारक ठरेल. सद्यस्थिती आणि सध्या कस्टमाइझ अभ्यासक्रमांची मागणी वाढत असल्यामुळे त्यातील निकषांमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात बदल झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी प्रवेशाच्या पारंपरिक कार्यपद्धतीत झालेला बदल होय. परदेशी विद्यापीठांत प्रवेश घेण्यासाठी जीआरई बरोबर इंग्लिश प्रोफिशिअन्सी- टोफेल/आयइएलटीएस, जीमॅट ॲडमिशन टेस्ट आणि स्कोलॅस्टिक अॅप्टिट्यूड टेस्ट या परीक्षा देणं आवश्यक असतं. गेल्या अनेक वर्षांपासून अनिवार्य असलेल्या जीआरइ/जीमॅट, इंग्लिश प्रोफिशीयन्सी इत्यादी प्रवेश परीक्षा न देण्याची सूट बऱ्याच विद्यापीठांनी या वर्षी दिलेली आहे. तसंच जे विद्यार्थी २०२२ आणि २०२३च्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना देखील या प्रवेश परीक्षांचे मार्क्स सबमिट अथवा या परीक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. यंदा अर्जांची संख्या वाढल्यानं आपोआपच स्पर्धा देखील वाढली आहे, म्हणूनच विद्यापीठं देखील प्रवेश धोरणाबाबत अत्यंत निवडक बनली आहेत. आम्हाला असं आढळून आलं की, बहुतांश विद्यार्थी जे शाळा, महाविद्यालयात उत्तम कामगिरी करतात परंतु या प्रवेश परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करणे त्यांना काहीसे कठीण जाते. तेव्हा यश मिळवण्यासाठी या प्रवेश परीक्षांची कशी तयारी करता येईल हे पुढे समजून घेऊ या... - परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या वेळेनुसार वेळापत्रक बनवा. - संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी अधिकृत पुस्तकं, सराव चाचण्यांसाठी ऑनलाइन उपलब्ध असलेल्या विविध टेस्ट वेबसाइट्सचा उपयोग करा. - जर संगणक आधारित चाचणी असेल तर ऑनलाइन सराव करणं अधिक हितकारक ठरेल. - जे नोकरी करता-करता या परीक्षांची तयारी करत आहेत अशांनी त्यांचं काम आणि घर यात संतुलन साधणं आवश्यक आहे. संतुलित जीवनशैलीमुळे तुम्हाला उत्साही तर वाटेल पण त्याचबरोबर परीक्षेच्या तयारीवर तुमचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल. करिअरच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन नियोजन सुरू करा. जर तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी या विद्यापीठांचे पर्याय सीमित करायचे नसतील तर या प्रवेश परीक्षा देणं नक्कीच फायदेशीर ठरेल. लक्षात घ्या, शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु झालेले नाही तेव्हा अधिक विलंब न करता परीक्षेच्या तयारीस नव्या जोमानं सुरुवात करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33fs4Xr
via IFTTT

Post a Comment

0 Comments