लांबणीवर पडलेल्या सीए इंटरमीडिएट, फायनल परीक्षांची सुधारित तारीख जाहीर

CA Exam 2021:आयसीएआयने सीए इंटरमीडिएट, फाइनल आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सेसच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता ५ जुलै २०२१ पासून आयोजित करण्यात आल्या आहेत. सीए इंटर, फायनल आणि पीक्यूसी परीक्षा स्थगित करण्यासंबंधी अपडेट आयसीएआयने बुधवारी २६ मे २०२१ रोजी यासंदर्भातील घोषणा केली. सुधारित वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. सीए परीक्षाए आयोजित करणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटंट्स ऑफ इंडिया’ () द्वारे जारी नोटिसनुसार, 'चार्टर्ड अकाउंटंट इंटरमीडिएट (ओल्ड स्कीम), इंटरमीडिएट (न्यू स्कीम) आणि फायनल (ओल्ड आणि न्यू स्कीम) आणि इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट (IRAM), टेक्निकल एक्झामिनेशन अँड इंटरनॅशनल टॅक्सेशन-असेसमेंट टेस्ट (INTT-AT) च्या मे २०२१ परीक्षांचे आयोजन आता सोमवार ५ जुलै २०२१ पासून होणार आहे. परीक्षांचा विस्तृत कार्यक्रम लवकरच जारी केला जाईल.' २५ हून अधिक दिवसांचा अवधी यापूर्वी आयसीएआयने २७ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या आपल्या अन्य एका परिपत्रकात असं म्हटलं होतं की सीए परीक्षांचे आयोजन आधी ठरल्यानुसार २१ आणि २२ मे पासून होणार नाही. या परीक्षांच्या सुधारित तारखा उमेदवारांनी किमान २५ दिवस अगोदर कळवल्या जातील. त्यानुसार संस्थेने आता ४० दिवस अगोदर परीक्षेची तारीख जाहीर केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uoxNFa
via IFTTT

Post a Comment

0 Comments