Also visit www.atgnews.com
JEE Advanced 2021: जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा लांबणीवर
postponed: जॉइंट एन्ट्रन्स एग्जाम (JEE) अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्था, IIT खरगपूरने JEE अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. करोना व्हायरस (COVID19) ची स्थिति लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी आयोजित होणार होती. 2021 नवी तारीख कधी? जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा तूर्त पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, परीक्षेची सुधारित तारखेची घोषणा यथावकाश जाहीर केली जाईल. उमेदवार जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर परिपत्रक पाहता येईल. नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे. सुमारे २.५ लाख विद्यार्थी प्रभावित जेईई मेन परीक्षा २०२१ क्वालिफाय करणारे विद्यार्थी अॅडव्हान्स्डसाठी पात्र असतात. प्रत्येक वर्षी सुमारे २.५ लाख विद्यार्थी जेईई मेन परीक्षेत पात्र ठरून मग जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करतात. प्रत्येक प्रवर्गातील रँक आणि गुण लक्षात घेता उमेदवारांची संख्या थोडी जास्त होऊ शकते. जेईई मेननंतर अॅडव्हान्स्डदेखील लांबणीवर जेईई मेन 2021 एप्रिल-मे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. यामुळे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ जुलै परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. करोना व्हायरस महामारीचे संकट पाहता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सध्या परीक्षा आयोजित करण्यासाठी सज्ज नाही. नीट-यूजी २०२१ देखील लांबणीवर पडली आहे. असं म्हटलं जात आहे की या सर्व स्थगित परीक्षांचे आयोजन ऑगस्टमध्ये करण्यात येईल. नोटीस जारी जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाइट वर जारी नोटिसनुसार, 'कोविड -१९ च्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर जेईई (अॅडव्हान्स्ड) २०२१ शनिवारी ३ जुलै २०२१ रोजी आयोजित होणार होती, ती आता स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारखेची घोषणा यथावकाश जाहीर केली जाईल.' जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट वर नियमित भेट द्यावी. परीक्षेचा पॅटर्न जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेत पेपर I आणि पेपर II असे दोन पेपर असतात. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पेपर होईल. दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oPcyvh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments