Also visit www.atgnews.com
CBSE 10th result: गुणांकन पद्धतीबाबत FAQ; कसे मिळणार मार्क, जाणून घ्या
class 10 marking policy 2021: दहावीचा निकाल (CBSE 10th result date) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षेशिवाय कसा लावणार निकाल, याबाबत बोर्डाने यापूर्वीच सांगितले. पण या गुणांकन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ आहे. स्टूडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्सचा गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी परीक्षेसंबंधी फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चंस (FAQ) जारी केले आहेत. सीबीएसईने आपल्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर एफएक्यू जारी केले आहे. यात एकूण ५७ प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत. हे असे प्रश्न आहेत, जे सर्वसामान्यपणे विद्यार्थी-पालकांकडून विचारले जात आहेत. यातले काही प्रश्न येथे देत आहोत - प्रश्न: जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभरात एकही परीक्षा दिली नसेल तर त्याचं मूल्यांकन कसं केलं जाणार? उत्तर: शाळा आता अशा विद्यार्थ्यांची चाचणी घेऊ शकतात. ही टेस्ट ऑफलाइन किंवा ऑनलाइन किंवा फोन कॉल द्वारे घेऊ शकतात. शाळांनी या चाचणीचे प्रमाण बोर्डाला पाठवायचं आहे. प्रश्न: जर पालकांना मुलांची उत्तरपत्रिका पाहायची असेल किंवा निकालानंतर गुणांची पडताळणी करायची असेल तर काय करावे? उत्तर: या वर्षीसाठी बोर्डाने ही सुविधा दिलेली नाही. तुम्ही टेस्ट कॉपी पाहू शकत नाही, गुणपडताळणीसाठी देखील अर्ज करता येणार नाही. प्रश्न: जर एखाद्या शाळेने एकापेक्षा जास्त प्री-बोर्ड परीक्षा घेतल्या असतील, तर विविध विषयांसाठी विविध प्री-बोर्डचे गुण ग्राह्य धरणार का? उत्तर: त्या शाळेची निकाल समिती सीबीएसई बोर्डाची मार्किंग पॉलिसी ध्यानात ठेवून योग्य निर्णय घेऊ शकते. पण त्यांना बोर्डाला पाठवण्याच्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख करावा लागेल. प्रश्न: कोणत्या परिस्थितीत कोणत्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित ठरवले जाऊ शकते? उत्तर: जर कोणी विद्यार्थी शहरात नसेल आणि फोनवर देखील उपलब्ध नसेल, त्या विद्यार्थ्याला शाळा अनुपस्थित ठरवू शकते. जर एखादा विद्यार्थी प्री बोर्डमध्ये गैरहजर होता, आणि त्याच्या पालकांशीही बोर्डाला संपर्क साधता आला नाही, तेव्हा त्याला अॅबसेंट मार्क केला जाऊ शकतो. प्रश्न: सीबीएसईने कमाल ८० गुणांसाठी मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. मात्र जर एखाद्या शाळेने कमाल ३० किंवा ५० किंवा ७० गुणांसाठी परीक्षा घेतली असेल तर मूल्यांकन कसे असेल? उत्तर: अशा स्थितीत पुढील पद्धतीने मूल्यांकन होईल. समजा एखाद्या विद्यार्थ्याला ३० पैकी २५ गुण मिळाले असतील तर - Out of 50 २५X५० = १२५०/३० = ४१.६६ (४२ गुण) Out of 70 २५X७० = १७५०/३० = ५८.३३ (५८ गुण) Out of 80 २५X८० = २०००/३० = ६६.६६ (६७ गुण) प्रश्न: जर रेफरन्स इयरमध्ये कोणत्या अतिरिक्त विषयांची परीक्षा झाली नाही, जो विषय यावर्षी विद्यार्थ्याने ऑप्ट केला आहे, तर त्याचे गुण कसे मिळणार? उत्तर: मेन पाच सब्जेक्ट्स (दोन मुख्य भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र) व्यतिरिक्त कोणत्याही भाषा किंवा अतिरिक्त विषयात (जिसकी परीक्षा उस स्कूल के रेफरेंस ईयर में नहीं हुई थी) बेस्ट तीन विषयांच्या गुणांची सरासरी काढून गुण दिले जातील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Sr8B3Q
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments