Also visit www.atgnews.com
परदेशी जाणारे विद्यार्थी, खेळाडूंना कोव्हिशिल्ड लशीच्या दुसऱ्या डोसचा मोठा दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांना महापालिकेने लसीकरणात मोठा दिलासा दिला आहे. या सर्वांना कोव्हिशिल्ड लशीच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे. ही सवलत ३१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवारी कस्तुरबा, केईएम, सेव्हन हिल, कूपर, शताब्दी, राजावाडी रुग्णालय; तसेच दहिसर करोना केंद्रात लशीचा दुसरा डोस घेता येईल, अशी माहिती पालिकेने मंगळवारी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. परदेशात शिक्षण घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे परदेशातील संबंधित विद्यापीठाचे प्रवेश निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, परदेशी व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म आवश्यक आहे. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण पूर्ण करून पुन्हा परदेशात जायचे असल्यास संबंधित विद्यापीठ किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित असलेली अधिकृत कागदपत्रे बंधनकारक आहेत. परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांकडे संबंधित कंपनीचे ऑफर लेटर, मुलाखतीचे पत्र, तसेच पुन्हा नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांकडे संस्थेच्या प्रमुखांचे पत्र (एम्प्लॉयर लेटर) असावे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा अधिकारी यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचे अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देताना, त्यावर पारपत्राचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पहिला डोस घेताना पुरावा म्हणून पारपत्र दाखवले नसेल, तर लसीकरण अधिकाऱ्यांनी त्याचा आग्रह न धरता वेगळे प्रमाणपत्र द्यावे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. कोव्हिशिल्ड मान्यता लसीकरण केंद्रावरील नोडल अधिकाऱ्यांना परदेशी जाणाऱ्यांकडून लसीकरणाचा नमुना फॉर्म भरून घेऊन कोविड पोर्टलवर अपलोड करावा लागेल. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस आपत्कालीन वापरासाठी मान्य केल्याने लसीकरण प्रमाणपत्रात या लशीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zEuoWX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments