करोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत,'या' विद्यापीठाची योजना

Fund for Benevolence :जामिया हमदर्दने करोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत देणार असल्याची घोषणा केली. या विद्यार्थ्यांना हफ्त्यांमध्ये फी भरण्याचे प्रावधान देण्यात आले आहे. अनाथ मुलांना फी भरण्यास उशीर झाल्यास लेट फी देखील माफ करण्यात आली आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांच्या घरची कमावणारी व्यक्ती निघून गेली. अशावेळी ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. म्हणून गरजू विद्यार्थ्यांसाठी हा फंड बनवण्यात आल्याचे जामिया विद्यापीठाने म्हटले आहे. 'विशेष कोविड कोष' निर्मितीबाबत कुलगुरु प्राध्यापक एमए जाफरी यांनी माहिती दिली. आमच्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागतोय असे ते म्हणाले. करोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना आई-वडील गमवावे लागले. त्यांच्या परीवारात ते एकमेव कमावणारे होते. अशा विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाणार असल्याचे ते म्हणाले. 'Fund for Benevolence' अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठातील खर्चासाठी मदत केली जाणार आहे. ग्रुप 'ए' आणि त्यावरील टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग यांच्या पगारातील काही भाग कापून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी फंड बनवला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TJ1rZe
via IFTTT

Post a Comment

0 Comments