Also visit www.atgnews.com
CBSEचे शिक्षकांसाठी मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स,डिटेल्स जाणून घ्या
Multi skill Foundation Course : ने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. CBSE तर्फे सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने लॅंड-अ-हॅंड संस्थेसोबत मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. 'मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स' च्या मूळ संकल्पनेवर एक ऑनलाईन लर्निंग आणि असेसमेंट मॉड्यूल तयार केले आहे. CBSE च्या शिक्षकांसाठी हा कोर्स २९ जून ते ८ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. या कोर्समध्ये भाग घेण्याचे आवाहन CBSE तर्फे करण्यात आले आहे. या कोर्सचे ३ मॉड्यूल आहेत. पहिले मॉड्यूल हे औद्योगिक विषयावर आहे. यामध्ये कार्यशाळा आणि इंजिनियरींग टेक्निक, उर्जा आणि पर्यावरण हे विषय आहेत. दुसरे मॉड्यूल हे जीवन विज्ञान विषयावर आहेत. बागवानी, नर्सरी आणि कृषी तंत्र आणि खाद्य संवर्धन तंत्र हे विषय यामध्ये येतात. अधिकृत माहितीनुसार मॉड्यूलमधील विषय हे रोजगार योग्यता कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणशास्त्रावर आधारित आहेत. तीन मॉड्यूलमध्ये पास होण्यासाठी कमीतकमी ५०टक्के गुण असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर CBSEच्या शिक्षकांना अर्ज करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ओरिएंटेशन सेशनमध्ये सहभागी होता येणार नाही. यासोबत तुम्हाला प्रशिक्षण लिंक आणि असेसमेंटमध्ये देखील सहभागी होता येणार नाही. उमेदवार २७ जूनपर्यंत अर्ज करु शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qeMo5V
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments