MHT-CET 2021: सीईटीसाठी नोंदणी लाखावर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा, म्हणजेच सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत ८७ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी पूर्णत: नोंदणी केली आहे. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द झाली. हा निर्णय झाल्यानंतर सीईटी परीक्षेसाठी नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटांसाठी २०२१ चा परीक्षेचा पॅटर्न सीईटी सेलने जाहीर केला आहे. याशिवाय परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लागू होणार नाही. एमएचटी सीईटी २०२१च्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने अॅप्लिकेशन बेस्ड असणार आहेत. या सीईटीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी ७ जुलैपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ही सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. नोंदणी, शुल्क भरण्याचे बाकी - ८७,५७२ फी भरलेले विद्यार्थी - ८३,८९२ मोबाइलच्या माध्यमातून नोंदणी - ४३,०३२ एकूण आतापर्यंत नोंदणी - १,२८,५५० .............. पुणे - ९१३८ नगर - ६१११ नाशिक - ४७९४ मुंबई - ४७८० ठाणे - ४६०६ नागपूर - ४३९४ सोलापूर- ३३८१ जळगाव- २९३९ सातारा - २७१० औरंगाबाद- २४८४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wEUgQw
via IFTTT

Post a Comment

0 Comments