Also visit www.atgnews.com
क्रॅश कोर्स करणाऱ्या १ लाख करोना योद्ध्यांना मिळणार स्टायपेंडसह अनेक सुविधा
Programme: (PM Narendra Modi)यांनी शुक्रवार १८ जूनला १ लाख '' तयार करण्यासाठी प्रोग्राम (Crash Course Programme)चे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कस्टमाइज्ड क्रॅश कोर्सची माहिती दिली. करोना योद्ध्यांचे स्किल्ड आणि अपस्किल्ड करणे हे या कोर्सचे उद्दीष्ट आहे. करोना व्हायरस अजूनही आपल्यात असून हा बदलत राहण्याची शक्यता आहे. अशा काळात क्रॅश कोर्स करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना त्यांनी शुभेच्छा दिल्या. नॉन-मेडिकल फील्डमधून असून देखील हेल्थकेअर वर्कर्ससोबत उभे राहतील अशी आशा व्यक्त केली. २१ जून पासून सर्वांचे मोफत लसीकरण केले जाईल अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. क्रॅश कोर्स प्रोग्राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया अंतर्गत करोना फ्रंटलाइन वर्कर्ससाठी (COVID19 frontline workers) ६ कस्टमाइज्ड क्रॅश कोर्सचे उद्घाटन केले. या मॉड्यूलमध्ये होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडवान्स्ड केअर सपोर्ट, एमरजन्सी केअर सपोर्ट, सॅंपल कलेक्शन सपोर्ट आणि मेडिकल इक्विपमेंट सपोर्टचा समावेश आहे. प्रशिक्षणानंतर हे वर्कर्स करोना संक्रमितांसाठी डॉक्टरांची मदत करणार आहेत. २६ राज्य १०० पेक्षा जास्त सेंटर्समध्ये कोर्स देशात १ लाख फ्रंटलाइन वर्कर्स तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा प्रोग्राम देशातील २६ राज्यांच्या १११ ट्रेनिंग सेंटर्सवर चालविला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. क्रॅश कोर्सच्या उद्घाटनावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि व्यावसायिक मंत्री देखील उपस्थित होते. देशातील १ लाख तरुणांना प्रशिक्षण देणारा हा क्रॅश कोर्स प्रोग्राम २ ते ३ महिन्यांत पूर्ण होऊ शकणार आहे. निशुल्क प्रशिक्षण, स्किल इंडियाचे प्रमाणपत्र, जेवण आणि राहण्याच्या व्यवस्थेसोबत स्टायपेंड देखील मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zx3LTH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments