Also visit www.atgnews.com
कोविडमुक्त गावातील शाळांची घंटा घणघणणार; आठवी ते १२ वीच्या वर्गांना सरकारचा हिरवा कंदील
कोविड-१९ महामारी संक्रमणामुळे गेले वर्षभर राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता करोना संसर्गाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निवळत असल्याने कोविडमुक्त गावातल्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. तसे परिपत्रक सरकारने सोमवारी ५ जुलै रोजी जाहीर केले आहे. या शासन परिपत्रकानुसार, राज्यातील कोविडमुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी तेथील ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा ठराव मंजूर करावयाचा आहे. हा ठराव पालकांशी चर्चा करून नंतरच करायचा आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. पुढील नियम पाळणे शाळांना बंधनकारक - - शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने मुलांना शाळेत बोलावण्यात यावे. विविध सत्रात वर्ग भरवावेत. - एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी असावेत. - विद्यार्थ्यांनी सतत हात धुणे, मास्कचा वापर करावा. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्वरित करोना चाचणी करून घेणे आदी बाबींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे. - संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये. - शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे. - पालकांनी आजारी किंवा लक्षण असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. - विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. - शाळेचा परिसर दररोज नियमित स्वच्छ केला जावा. - वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे जिने, स्वच्छतागृहे आदी भाग यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. नियमित शाळांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान शाळा बंद आणि मुलं घरी राहण्याचे मुलांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकात नमूद केले आहे. 'शाळा बंद असल्यामुळे मुलं एक वर्षापासून घरी बसली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होत आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे सोशलायझेशन होत नसल्याने त्यांच्या सामाजिक कौशल्यांचे नुकसान होत आहे. इंटरनेट, मोबाइलचा गैरवापर, गेम्सचं व्यसन, मानसिक तणाव, बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट अशा विविध प्रकारे मुलांचे नुकसान होत असल्याने त्यांना नियमित शिक्षण मिळावे म्हणून कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती,' असे या परिपत्रकात म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dGibY3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments