NIPUN Bharat 2021: शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत लॉंच, पाहा डिटेल्स

2021: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी निपूण भारत (NIPUN Bharat)कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. देशातील विद्यार्थ्यांना साक्षर आणि संख्यात्मक बनविण्याचा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. वर्च्युअल माध्यमातून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वर्च्युअल माध्यमातून एक छोटा व्हिडीओ, गीत आणि गाइडलाइन्स जाहीर करण्यात आले. दुपारी १२ ते १ या दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी याचे ऑनलाइन उद्घाटन केले. या कार्यक्रमासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी स्वत: माहिती दिली. तसेच आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन यासंदर्भात माहिती दिली. हा कार्यक्रमामध्ये सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या शालेय शिक्षण विभागातील ज्येष्ठ अधिकारी, विभागाचे अधिकारी आणि संस्थाप्रमुख सहभागी झाले होते. निपूण भारत कार्यक्रम शिक्षण विभागाद्वारे लागू करण्यात आला. शिक्षण विभाग हा कार्यक्रम ५ टप्प्यात लागू करणार आहेत. यामध्ये राष्ट्र, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शाळा सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्व राज्यांमध्ये समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत चालवला जाणार आहे. कार्यक्रम नवी राष्ट्रीय शिक्षण प्रणाली २०२० (NEP2020) लागू करण्याच्या दिशेने अवलंबल्या गेलेल्या प्रयत्नांपैकी एक आहे. नव्या शैक्षणिक धोरणात सरकारने आधारभूत साक्षरता आणि संख्यात्मकता वर विशेष जोर दिला आहे. या अंतर्गत संकल्पनेती सुरुवात केली जात आहे. हा कार्यक्रम देशामध्ये समग्र शिक्षण आणि साक्षरतेमध्ये सुधारणा करण्यास सहकार्य करणार आहे. आधारभूत शिक्षण आणि संख्यात्मक ज्ञानासाठी एक सर्वसुलभ वातावरण तयार सुनिश्चित करायला हवे. ज्यामुळे विद्यार्थी वर्ष २०२६-२७ पर्यंत ग्रेड ३ च्या शेवटापर्यंत वाचणे, लिहिणे आणि अंकगणित शिकण्याची क्षमता मिळवू शकतील. राष्ट्रीय शिक्षण निती २०२० कार्यान्वयित करण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांच्या श्रृंखलेत मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xvnilK
via IFTTT

Post a Comment

0 Comments