Also visit www.atgnews.com
महाडीबीटीने दिली शिष्यवृत्ती अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाडीबीटी पोर्टलतर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांना () अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्यांनाही ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलतर्फे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, वसतिगृह खर्चासाठी विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्ती (Higher Education Scolarships) दिल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्यवृत्तींना अर्ज करण्यासाठी यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विद्यापीठ, महाविद्यालयांनी या संदर्भात तातडीने विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून येणारे अर्ज दररोज निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाविद्यालयांची अनास्था? विद्यार्थ्यांनी तातडीने शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे उच्च शिक्षण विभागाकडून वारंवार सांगितले जात असले तरी अद्याप विद्यार्थी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यासाठीच विभागाला वारंवार मुदतवाढ द्यावी लागत असून, ही शेवटची मुदतवाढ आहे. महाविद्यालये, विद्यापीठांनीही विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देणे आवश्यक असून, याबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर अनास्था असल्याचे सांगितले जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AnyodN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments