Also visit www.atgnews.com
दहावी उत्तीर्णांसाठी सीमा सुरक्षा दलात भरतीची सुवर्णसंधी
BSF Constable GD Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बीएसएफमध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा बलाने (बीएसएफ) नॉन-गजेटेड आणि नॉन-मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफ द्वारे एकूण २६९ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती क्रीडा कोट्यांतर्गत होणार आहे. बीएसएफ कॉन्सटेबल जीडी भर्ती 2021 अधिसूचनेनुसार जाहिरातीत दिलेल्या तपशीलानुसार कॉन्स्टेबल (जीडी) ग्रुप सी पदांवर भरती होईल. कुठे आणि कसा करायचा अर्ज? बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भरती 2021 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑफिशियल रिक्रूटमेंट पोर्टल, rectt.bsf.gov.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. उमेदवार या वृत्तात पुढे दिलेल्या थेट लिंकद्वारे देखील भरतीची अधिसूचना डाऊनलोड करू शकतात आणि थेट अॅप्लिकेशन पेज वर जाऊ शकतात. बीएसएफ जीडी कॉन्सटेबल पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. पात्रता ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा दिली आहे आणि पदांनुसार संबंधित खेळात १ सप्टेंबर २०१९ ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत भाग घेतला आहे किंवा पदक मिळवले आहे, असे उमेदवार बीएसएफ क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदांसाठी अर्ज करू शकतात. पुरुष उमेदवारांची शारीरिक उंची किमान १७० से.मी. आणि महिला उमेदवारांची शारीरिक उंची किमान १५७ से.मी. असायला हवी. उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२१ रोजी किमान १८ वर्ष ते कमाल २३ वर्ष असावे. अन्य संबंधित पात्रतेसाठी भरती अधिसूचना वाचावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CyGO46
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments