Also visit www.atgnews.com
सीबीएसई दहावी, बारावी कम्पार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
10th 12th Compartment Exam Time Table 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने दहावी आणि बारावी कम्पार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या कम्पार्टमेंट परीक्षा २५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. दोन्ही इयत्तांचे पूर्ण वेळापत्रक बातमीच्या खाली असलेल्या लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करु शकता. सीबीएसई दहावी कम्पार्टमेंट परीक्षा (CBSE 10th compartment exam 2021) २५ ऑगस्टपासून सुरु होऊन ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत राहणार आहे. सीबीएसई बारावी कम्पार्टमेंट एक्झाम (CBSE 12th compartment exam 2021)२५ ऑगस्टपासून १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल. कोण देऊ शकेल परीक्षा? ज्या विद्यार्थ्यांना रिझल्टमध्ये कम्पार्टमेंट मिळाले केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी यंदा ही परीक्षा नसेल. तर जे विद्यार्थी सीबीएसई दहावी, बारावीच्या निकालावर नाराज आहेत आणि ज्यांनी परीक्षा दिली नागी. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल सीबीएसई मूल्यांकन टॅब्यूलेशन पॉलिसी २०२१ अंतर्गत लागला नाही. म्हणजेच सीबीएसईच्या इम्प्रूवमेंट कॅटगरीत ठेवलेल्या रेग्युलर विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होतो. याशिवाय असे विद्यार्थी जे २०२१ मध्ये सहाव्या विषयासाठी पात्र ठरले आणि पास झाले पण मुख्य ५ विषयांमध्ये एकाही विषयात पास झाले नाहीत. सीबीएसई बोर्ड (CBSE Board) दोन्ही इयत्तांसाठी एका दिवशी एका विषयाची परीक्षा आयोजित करणार आहे. या सर्व परीक्षा दिलेल्या तारखांना सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका परीक्षा सुरु होण्याच्या १५ मिनिटे आधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्रश्न वाचण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ मिळेल. विद्यार्थी १०.३० वाजता उत्तर लिहायला घेऊ शकता. पूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ixCmud
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments