Also visit www.atgnews.com
MHT CET 2021: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
MHT CET 2021: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (Maharashtra Common Entrance Test Cell)तर्फे पुन्हा एकदा एमएचटी सीईटी अर्ज विंडो खुली केली जाणार आहे. या दरम्यान, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जाची विंडो उद्यापासून म्हणजेच १२ ऑगस्टपासून खुली केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेला नाही ते आता यासाठी अर्ज करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ आहे. साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mahacet.org वर लॉगिन करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांना १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान MHT CET 2021 अर्ज विंडोमधील त्यांच्या माहितीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. MHT CET 2021 अर्ज विंडोबद्दल शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२१ या प्रवेश परीक्षांकरिता आतापर्यंत ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी दिनांक १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. तसेच याआधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत संधी देण्यात येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट http://mahacet.org वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे. MHT CET 2021 application form: असा करा अर्ज पीजी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वात आधी महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा. मुख्यपृष्ठावर उपलब्ध उच्च शिक्षण विभागात जा. तुमच्या संदर्भाप्रमाणे अभ्यासक्रम निवडा. तुम्ही आधीच नोंदणीकृत असाल तर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा किंवा तुमचे ओळखपत्र वापरून लॉगिन करा. 'MHT CET 2021 अर्ज फॉर्म' भरा आणि सबमिट हा पर्याय निवडा भविष्यातील उपयोगासाठी सबमिट केलेल्या MHT CET 2021 अर्जाची प्रिंट घ्या. अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ABU3iB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments