Also visit www.atgnews.com
टप्प्याटप्प्यांत वर्ग, चार तासांची मर्यादा; शाळा सुरू करण्यासाठी बालरोग टास्क फोर्सचा सल्ला
म. टा. प्रतिनिधी, पुणे शाळा सुरू करण्याविषयी (schools reopening) राज्याच्या ने शाळांसाठी वैद्यकीयदृष्ट्या तयार केलेली नियमावली शिक्षण विभागाने स्वीकारली आहे. आरोग्याचे भान ठेवत टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करणे, चार तासांची मर्यादा आणि सुरक्षित अंतर यांसारख्या महत्त्वाच्या नियमांची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असून, शाळा कधी सुरू होणार याविषयी विविध तर्क लढवण्यात येत आहेत. 'बालरोग टास्क फोर्सने वैद्यकीयदृष्ट्या शाळांमध्ये मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबत सल्ला दिला आहे. शाळा सुरू होतील, तेव्हा दक्षता कशी घेतली पाहिजे, काय प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील, याची नियमावली तयार करून दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले,' असे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि बालरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. राज्य सरकारने नियमावलीचा स्वीकार केला असून, शाळा सुरू होतील, तेव्हा शिक्षण विभागाकडून तयार होणाऱ्या 'एसओपी'मध्ये त्याचा समावेश केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आम्ही तयार केलेल्या नियमावली विद्यार्थी, पालक, शाळांसाठी उपयुक्त ठरतील,' असा विश्वासही डॉ. जोग यांनी व्यक्त केला. शाळांनी काय खबरदारी घ्यावी? - वर्गातील मुलांची संख्या कमी करण्यासाठी शाळा दोन टप्प्यांत सुरू करता येईल. - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असावे. - शाळा सुरू होण्याआधी पालक-शिक्षक संघाची सभा घेऊन याबाबतची माहिती पालकांना द्यावी. - बस, रिक्षांतून येताना त्यांच्या खिडक्या उघड्या असाव्यात, त्यामध्ये एसी नको. - शाळा सुरू होताच त्वरित मैदानी खेळ सुरू करू नयेत. शाळा सुरू करण्याबाबत राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने फक्त नियमावली तयार केली आहे. शाळा सुरू करा अथवा करू नका, असा कोणताही सल्ला दिला नाही. शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागच घेईल. - डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोग टास्क फोर्स मुलांची संख्या मर्यादित ठेवा मुलांची शाळेतील मर्यादित राहावी, यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शाळा दोन टप्प्यात सुरू कराव्यात किंवा एकाआड दिवस शाळा सुरू ठेवून एक दिवस ऑनलाइन, एक दिवस ऑफलाइन असे वर्ग घ्यावे, असेही सुचविण्यात आले आहे. एका वेळी चार तासांपेक्षा अधिक काळासाठी शाळा सुरू ठेवू नयेत, असेही तज्ज्ञांनी यात म्हटले आहे. शाळांमध्ये हवे आरोग्य केंद्र अनेक दिवस शाळा बंद असल्याने शाळा, परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृहे स्वच्छ करावेत. तसेच मुले शाळेत आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शाळांमध्ये आरोग्य केंद्र स्थापन करावे. शाळांमध्ये थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर अशी उपकरणे, पॅरासिटोमॉलची औषधे व प्रथमोपचार पेटी असावी; तसेच डॉक्टर, अॅम्ब्युलन्सचे संपर्क क्रमांक ठेवावे, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BoF6Ri
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments