Also visit www.atgnews.com
CBSE Board Exams 2021: दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षा कधी? जाणून घ्या
CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे (सीबीएसई) दहावी, बारावीसाठी बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. आज सर्व विद्यार्थ्यांसाठी दहावी, बारावी ऑफलाइन वेळापत्रकात सुधार, कंपार्टमेंट, पत्रव्यवहार आणि खासगी परीक्षांची घोषणा केली जाईल. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल ३० जुलैला आणि दहावी परीक्षेचा निकाल ३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर केला. जे उमेदवार त्यांच्या मिळालेल्या गुणांवर समाधानी नाहीत ते बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या चाचणीला उपस्थित राहू शकतात. सीबीएसई बोर्डातर्फे १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत दहावी आणि बारावीच्या सुधारणा आणि कंपार्टमेंट परीक्षा घेण्यात येणार आहेत. कंपार्टमेंट आणि सुधारणा परीक्षा देश आणि परदेशातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाईल. यावेळी करोना प्रोटोकॉलनुसार परीक्षा आयोजित केल्या जातील. २०२१ च्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्यात आलेल्या निकालावर नाराज असलेल्या किंवा आपल्या गुणांमध्ये सुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पोर्टलद्वारे अर्ज करता येणार आहे. २ ऑगस्टच्या नोटीसनुसार, ज्या उमेदवारांचा निकाल २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापन पद्धतीच्या आधारे जाहीर झाला नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37yhCw1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments