MPH Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात ३,४६६ पदांची भरती

MPH : महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळविण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात (Maharashtra Public Health Department) ग्रुप डी साठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये () एकूण ३ हजार ४६६ पदांची भरती होणार आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट groupc.arogyabharti2021.in वर जावे लागेल. महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागातर्फे (MPH)जाहीर करण्यात आलेल्या भरती नोटिफिकेशननुसार (MPH Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीची (MPH Recruitment 2021) अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाची लिंक काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. असा करा अर्ज यासाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट groupc.arogyabharti2021.in वर जा. होमपेजवर Vacancy Matrix लिंकवर क्लिक करा संबंधित पोस्टच्या लिंकवर क्लिक करा यामध्ये मागितलेली माहिती भरुन नोंदणी करा नोंदणीनंतर अर्ज फॉर्म भरा पात्रता महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या ग्रुप डी पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिक, रसायन विज्ञान, जैव विज्ञान यामध्ये बारावी असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय हे २१ ते ३९ वर्षांदरम्यान असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे जाहीर केलेल्या सूचनेनुसार ७ ऑगस्टपासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती तपशिल (MPH Recruitment 2021) या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याआधी एमपीएच भरती २०२१ चे संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. ग्रुप डीच्या रिक्त पदांची संख्या, अर्ज प्रक्रिया, महत्वपूर्ण तारखा, अर्ज शुल्क, वयोमर्यादा या सहित इतर माहिती तपासून नंतर अर्ज करा. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jJMOhw
via IFTTT

Post a Comment

0 Comments