Also visit www.atgnews.com
पुणे विद्यापीठ पीजी डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश परीक्षा २० ऑगस्टला
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे चालवण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अशा २७ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. येत्या २० ऑगस्टला दोन सत्रांमध्ये या परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. या परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करून या सर्व अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश सुरू होतील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या दहा विभागांतर्फे चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा होत आहे. त्यामध्ये भूगोल, माध्यमे आणि संज्ञापन, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सामरिक अभ्यास, परकीय भाषा, पाली विभाग, संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग, अर्थशास्त्र, महिला अभ्यास केंद्र, शारीरिक शिक्षण विभाग या विभागांचा समावेश आहे. येत्या २० ऑगस्टला सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. कोणत्या अभ्यासक्रमाची परीक्षा कधी, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.unipune.ac.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत प्रवेशपत्र दिले जाणार असून, त्यामध्ये प्रॉक्टर्ड पद्धतीने होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचा लॉग-इन आयडीदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी विद्यापीठातर्फे १६ व १७ ऑगस्ट रोजी सराव परीक्षा आयोजित केली जाणार असून, या मुख्य परीक्षेचा सराव होण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सराव परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी मोबाइल, लॅपटॉप, टॅब, कम्प्युटर या साधनांच्या आधारे लॉग-इन करता येणार आहे. एकदा लॉग-इन केल्यानंतर एका तासाच्या आत विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देऊन परीक्षा पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी होणार परीक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रम १. जीआयएस अँड रिमोट सेन्सिंग, २. सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन , ३. इंटेन्सिव्ह सर्टिफिकेट इन जर्मन , ४. इंटेन्सिव्ह सर्टिफिकेट इन स्पॅनिश ५. इंटेन्सिव्ह सर्टिफिकेट इन जॅपनीज पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम १. पीजी डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज, २. क्लिनिकल रिसर्च अँड स्टडीज, ३. इलेक्ट्रिक मोबिलिटी, ४. डेटा सायन्स, ५. छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डिंग, ६. सायबर अँड इंडियाज नॅशनल सिक्युरिटी, ७. काउंटर टेररिझम स्टडीज, ८. डिफेन्स अॅनलिस्ट अँड नॅशनल सिक्युरिटी, ९. डिझास्टर मॅनेजमेंट अँड नॅशनल सिक्युरिटी, १०. डिप्लोमा इन फ्रेंच, ११. जर्मन १२. जॅपनीज, १३. स्पेशल डिप्लोमा इन कमर्शियल फ्रेंच, १४. डिप्लोमा इन बुद्धिस्ट सायकॉलॉजी अँड एथिक्स, १५. वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रम, १६. मास मीडिया पदव्युत्तर पदविका, १७. डिप्लोमा इन डेटा अॅनलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स १८. पीजी डिप्लोमा इन जेंडर, कल्चर, अँड डेव्हलपमेंट १९. डिप्लोमा इन माउंटेनरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स अशी असेल ऑनलाइन परीक्षा - विद्यापीठाकडून घेण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश परीक्षा एकूण १०० गुणांची आहे. - यातील २० गुणांचा भाग हा सामान्य ज्ञानाचा आहे. - उरलेले ८० गुण हे संबंधित विषयांवर आधारीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी असतील. - विद्यार्थ्यांना हे दोन्ही भाग एका तासाच्या आत सोडवून पूर्ण करायचे आहेत. - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fRnfKp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments