NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेसाठी १० ऑगस्टपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

NEET UG 2021: नीट यूजी २०२१ ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पदवी स्तरीय मेडिकल आणि डेंटल प्रवेश परीक्षा नीट यूजी २०२१ साठी अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा यूजी म्हणजेच नीट २०२१ ची अर्ज करण्याची तारीख वाढविण्यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. १० ऑगस्ट रात्री ११.५० वाजेपर्यंत उमेदवारांना परीक्षा शुल्क भरता येऊ शकतो. याआधी नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट ठरविण्यात आली होती. अर्जात सुधार करण्यासाठी तारीख एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ठरवल्या गेलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केल्यानंतर उमेदवारांना आपल्या अर्जात बदल करण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवार आपल्या अर्जामध्ये बदल करु शकतील. अर्जामध्ये बदल करण्याचा पर्याय हा बंधनकारक नाही. त्यामुळे अर्जात बदल होणे गरजेचे आहे असे ज्या उमेदवारांना वाटते त्यांनीच या संधीचा उपयोग करुन घ्या. एनटीएने हा निर्णय आरोग्य विज्ञान महानिदेशालय (डीजीएचएस) आणि आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या शिफारसीनुसार केला आहे. नीट यूजी २०२१ संबंधी मंत्रालयाद्वारे ही शिफारस करण्यात आली होती. या रिझल्टचा उपयोग केंद्र आणि राज्य सरकारांच्या इतर संस्थांच्या पात्रता निकषांनुसार केला जाऊ शकतो. तसेच बीएससी (ऑनर्स) नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देखील या निकालाचा उपयोग होतो. ही नवी तारीख बीएससी (ऑनर्स) नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील लागू आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3in45hi
via IFTTT

Post a Comment

0 Comments