RRB NTPC चे परीक्षा शुल्क मागे घेण्यासाठी विंडो खुली होणार, जाणून घ्या

Fee Refund 2021: आरआरबी एनटीपीसी २०२१ दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. देशातील विविध झोनच्या रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) द्वारे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरी (एनटीपीसी) परीक्षा २०२१ चे शुल्क परत घेण्याची प्रक्रिया ११ ऑगस्ट २०२१ ला सुरु होणार आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा सात टप्प्यांमध्ये झाली असून नुकतीच संपली आहे. परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. आरआरबीची अधिकृत वेबसाइटवर यासाठी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला असून यामाध्यमातून अर्ज करायचा आहे. रेल्वेने ३१ ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख ठेवली आहे. उमेदवारांना द्यावा लागेल बॅंक डिटेल्स रेल्वे भरती बोर्डाद्वारे जाहीर केलेल्या अपडेटनुसार, जे उमेदवार आरआरबी एनटीपीसी सीबीटी-१ परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना शुल्क परत घेण्यासाठी आपल्या बॅंकेचा तपशिल द्यावा लागेल. नोंदवलेला बॅंक अकाऊंट नंबर, नाव आणि IFSC कोड योग्य आहे का हे लक्षपूर्वक पाहा. एकदा नोंदणी झाल्यानंतर त्यामध्ये बदल होणार नाही. तसेच आरआरबीने दिलेल्या अपडेटनुसार, बॅंक खात्याचा तपशिल ऑनलाइन भरताना काही अडचण आल्यास उमेदवारांच्या सहायतेसाठी अर्ज विंडोवर एक हेल्प विंडोदेखील एक्टीव्ह करण्यात आली आहे. परीक्षा शुल्क मिळेल परत रेल्वे भरती बोर्डाने वर्ष २०१९ च्या सुरुवातीला ग्रुप सी ची ३५ हजार २७७ पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले. या पदांसाठी अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांची कॉम्प्युटर आधारित परीक्षा सात टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. सातवा टप्पा ३१ जुलै २०२१ ला संपला. अर्ज करताना उमेदवारांनी ५०० रुपये शुल्क भरले होते. आरआरबीतर्फे पहिल्या टप्प्यातील परीक्षेनंतर ४०० रुपये परत दिले जात आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fOPXvE
via IFTTT

Post a Comment

0 Comments