'जग जीवशास्त्र आणि संगणकीय विज्ञानाच्या युगात प्रवेश करतंय'

२१ व्या शतकाची पहिली दोन दशकं ही माहिती तंत्रज्ञानाची होती. आता जग संगणकीय विज्ञानाच्या युगात प्रवेश करत असल्याचे बायकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ यांनी म्हटले आहे. संशोधनातील नाविण्याने आपण आरोग्य, शेती, पशुधन व्यवस्थापन, औद्योगिक प्रक्रिया आणि पर्यावरणीय टिकावामध्ये अमूलाग्र बदल घडवून आर्थिक विकास करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेनेट विद्यापीठाच्या पदवी समारंभ कार्यक्रमात त्यांना बायोटेक्नोलॉजीतील पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. बेनेट युनिव्हर्सिटीचा तिसरा दीक्षांत समारंभ ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. बेनेट विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रभू अग्रवाल यावेळी म्हणाले, किरण मजुमदार-शॉ यांच्या बायोटेक्नॉलीजीतील कामामुळे प्रगत विज्ञान थेरपी, नाविन्यपूर्ण टेक प्लॅटफॉर्म आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाला लाभ झाला. यामुळे मधुमेह आणि कर्करोगासारख्या उपचारांचा खर्च कमी होऊन आरोग्यसेवेत देखील सुधार होऊ शकला. नेस्ले इंडीयाचे चेअरमॅन आणि एमडी सुरेश नारायणन यांना देखील यावेळी फिलोसॉपी इन मॅनेजमेंटमधील मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी अग्रवाल म्हणाले, नारायणन यांनी कॉर्पोरेट जगतात आपला रॅंक वाढवला आहे. त्यांनी एफएमसीजी उद्योग ३५ वर्षांहून अधिक काळात अनेक देश आणि संस्कृतींमध्ये विस्तारला. याचा समृद्ध आणि व्यापक अनुभव त्यांच्याकडे आहे. नारायणन यांनी आपल्याला मिळालेली पदवी ही आई-वडील, पत्नी आणि मुलीला समर्पित केली. यावेळी ते म्हणाले, माझ्या आई-वडीलांमुळे हे शक्य झाले आहे. पण पदवी मिळताना पाहायला ते आता इथे नाहीत. माझ्या शिक्षणाचे महत्व त्यांनी सर्वाधिक जाणले होते. माझ्या वडिलांनी मध्यमवर्गीय कुटुंबात देखील मला देशाचा उत्तम नागरिक बनवण्यासाठी त्यावेळेचे सर्वोत्तम शिक्षण दिले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नॅसकॉमचे मुख्य डेबजानी घोष यांनी देखील यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. पदवीधर विद्यार्थ्यांनी अनिश्चितता, अस्थिरता, संदिग्धता अशा अस्वस्थेत देखील कम्फर्टेबल व्हा. हे तुम्ही करु शकता. आपल्याला आवश्यक असलेली कौशल्ये अस्पष्टता आणि अनिश्चितता हा आपला सर्वात मोठा स्पर्धात्मक फायदा बनणार आहे. म्हणूनच माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून अस्वस्थेमध्ये कन्फर्ट शोधण्यास मी शिकले असे त्या म्हणाल्या. बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ किरण मजुमदार शॉ आणि नेस्‍ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण कार्यक्रमाचे 'गेस्‍ट ऑफ ऑनर' म्हणून उपस्थित होते, तर NASSCOM च्या अध्यक्ष देबजनी घोष यांनी 'स्‍पेशल गेस्‍ट' म्हणून उपस्थिती लावली होती. युनिव्हर्सिटीचे कुलपती विनीत जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कुलगुरू डॉ. प्रभु अग्रवाल यांनी युनिव्हर्सिटीचा वार्षिक अहवाल सादर केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lM5IXY
via IFTTT

Post a Comment

0 Comments